उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली : – सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे १३ फेब्रुवारी व १० फेब्रुवारी २०२३ चे आदेशान्वये दि वाल्मीकी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्या.गडचिरोली र.नं.२०५३ ता.जि.गडचिरोली व जयलक्ष्मी दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या.ठाणेगाव र.नं.३०४ ता. आरमोरी जि.गडचिरोली, मत्स्य,दुग्ध सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असुन सदरहू संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करणे व स्विकारणे २७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३,नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे ७ मार्च २०२३,विधीग्राहय नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे ८ मार्च २०२३, उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेणे ९ मार्च ते २३ मार्च २०२३, उमेदवारांना बोधचिन्ह वाटप करणे व बोधचिन्हासहित अंतिम यादी प्रसिद्ध करणे.२४ मार्च २०२३,आवश्यक असल्यास मतदान घेणे,मतमोजनी व निकाल जाहिर करणे २६ मार्च २०२३.
वरील निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी मत्स्यपालन तथा दुग्ध सहकारी संस्थाचे नोटीस बोर्डवर व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध),गडचिरोलीचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केलेला आहे.तरी उपरोक्त दोन्ही सहकारी संस्थांचे सर्व सभासदांनी निवडणूक कार्यक्रमाची नोंद घ्यावी.असे तासनिअ तथा सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था (दुग्ध)गडचिरोली यांनी कळविले आहे.