Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीजावई-सासऱ्याची लढाई; बेदम मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू.. - अहेरी तालुक्यातील घटना..

जावई-सासऱ्याची लढाई; बेदम मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू.. – अहेरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील महागाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जावई आणि मुलगी बऱ्याच दिवसांपासून घरी वास्तव्यास राहायला आल्याने ‘तुम्ही इथे कशाला आले?’ असे म्हणीत दारूच्या नशेत सासऱ्याने वाद घातल्याने जावयाने सासऱ्याला बेदम मारहाण केली. झालेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला.मारहाणीत मृत्यू झालेल्या सासऱ्याचे नाव रमेश पोचम दुर्गे वय ५५ वर्षे रा.महागाव असे असून चंद्रशेखर हिरालाल पवार वय २५ रा.चितापूर तांडा,जिल्हा गुलबर्ग (कर्नाटक) असे आरोपी जावयाचे नाव आहे. सदरची घटना ही काल शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली असून आज,रविवार १५ जून रोजी उघडकीस आली.घटनेनंतर आरोपी जावयास अहेरी पोलिसांनी अटक केली आहे.
मयत रमेश दुर्गे हा दारूच्या आहारी गेला होता. यापूर्वीही त्याने पत्नीशी वाद घातल्याने त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.अश्यातच काल शनिवारी तो दारू पिऊन घरी गेला असता त्याने दारूच्या नशेत जावई चंद्रशेखर पवार सोबत वाद घातला.त्यातच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात चंद्रशेखर पवार याने सासऱ्याला बेदम मारहाण केली.यात रमेश दुर्गेचा मृत्यू झाला.प्रकरणी अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठत आरोपी जावयास अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!