उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- गेली १८ ते २० वर्षांपासून चंद्रपूर मार्गावरील आयटीआय चौकाजवळील जागेवर गोंडीयन समाजाचे सल्ला गांगरा आदिवासी बांधवांचे दैवत आहे.त्याच जागेवर गोंडीयन सल्ला गांगरा तर्फे विर बाबुराव शेडमाके जयंती,राणी लक्ष्मीबाई जयंती व गोंडीयन समाज बांधवांचे अनेक धार्मीक कार्यक्रम पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत.मात्र अचानकपणे गडचिरोली नगर परिषदे तर्फे कुठलीही शहानिशा न करता नोटीस धडकतो व सदर जागेवरील आदिवासी बांधवांचे दैवत हटवा; असे नोटिस बजावले जात असल्याने सदर प्रकरणामध्ये राजकीय खेळी तर नसावी ना? अशी शंका आदिवासी बांधवांच्या मनात घर करून,गोंडीयन सल्ला गांगरा दैवतांची जागा हडपण्याचा आदिवासी बांधवांनी आरोप केला आहे.
आदिवासी बांधवांच्या मते,सदर जागा हि नझुलची आहे.मात्र राजकीय खेळी वा इतर कारणांमुळे कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता गडचिरोली नगर परिषदेतर्फे नाहक विनाकारण आदिवासी बांधवांना त्रास दिले जात असल्याचे आदिवासी बांधवांनी म्हटले आहे.सदर जागेवर कुणाचीही तक्रार नसतांना व आदिवासी बांधव सदर जागेवर गेल्या १८ ते २० वर्षांपासून आदिवासी बांधव दैवतांची पुजा-पाठ व विविध कार्यक्रम घेत असनांना आदिवासी बांधवाना विनाकारण त्रास देणे सुरु केल्यामुळे आदिवासीं बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.सदर जागेबाबत कुणीही त्रास देवू नये व आदिवासी बांधवांना सदर जागेवर आपल्या दैवतांचे धार्मिक कार्यक्रम करू द्यावे; अन्यथा सर्वत्र याचे पडसाद उमटणार असून कुणीही जागा हाडपण्याच्या भ्रमात जाऊ नये; असेही आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे.
आदिवासी बांधवांच्या दैवतांची पुजा-अर्चना करण्यास नाहक त्रास देणाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नसल्याचे आदिवासी बांधवांनी म्हटले आहे. प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्र्वर बोरकर,आदिवासी बांधव सुरज किरंगे, वंसत पेंदराम, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक बारीकराव मडावी,सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक शिवराम कुमरे,सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक निरिक्षक चरणदास पेंदाम,केशव गेडाम,चंदु कुळमेथे,कुणाल कोवे हरिभाऊ मडावी,विष्णुदास कुमरे,वर्षा पेंद्राम,माया कोटनाके,उदय नरोटे,विठोबा मडावी,मालती पुडो,कुसुम वाळवे,सुनिता तलांडी,प्रतिभा कुमरे,संगिता टेकाम,सुनंदा गेडाम सहीत मोठ्या प्रमाणावर आदिवासी महिला व आदिवासी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.