Monday, August 17, 2026
Homeएटापल्लीजल जीवन मिशन अंतर्गत जारावंडी येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन- माजी...

जल जीवन मिशन अंतर्गत जारावंडी येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन- माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

एटापल्ली :- ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळावे;या हेतूने शासनाच्या वतीने जलजीवन मिशन योजना हाती घेण्यात आली आहे.  योजनेचा लाभ देण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावाची निवड करण्यात आली असून नुकतेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.सदर योजनेमुळे नागरिकांचा पाण्याचा खर्च कमी होणार असून स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळणार आहे.

 उद्घाटन प्रसंगी बोलताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून आपल्या दारापर्यंत नळाद्वारे पाणी येणार आहे.परंतु पाणी जपून वापरणे ही काळाची गरज आहे.पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीचे नियोजन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे असे आवाहन केले.

३८ लाख १७ हजार २४६ रुपयांच्या निधीतून जारावंडी येथे जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा काम पूर्ण केले जाणार आहे.याप्रसंगी माजी पं. स.सभापती बेबीताई नरोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे एटापल्ली शहराध्यक्षा पौर्णिमा श्रीरामवार,सचिव सुमन दुर्वा,सरपंच सपना कोडापे,येमली चे सरपंच ललिता मडावी,माजी नगरसेविका सगुणा कांदो,जारावंडी येथील उपसरपंच, सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!