उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली : –जिल्ह्यातील वडसा वन विभागा अंतर्गत येणाऱ्या डोंगरगांव-पळसगाव जंगल परिसरा नजिक आरमोरी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८५ मध्ये१६ सप्टेंबर २०२३ रोजी ४ वाजेच्या सुमारास जंगली हत्तीच्या तावडीत सापडल्याने वनविभागात कार्यरत वाहनचालक सुधाकर बापूराव आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला होता.
सदर घटनेने अस्वस्थ झालेले वनमंत्री मुनगंटीवार हे वनशहीद सुधाकर आत्राम यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या विसापुरात दाखल झाले.त्यांनी वन शहीदाची पत्नी रिना आत्राम यांना २५ लाखांचा धनादेश सुपुर्द केला.रिना यांना अनुकंपा योजनेनुसार चंद्रपूरचे वनविभागात नोकरी करण्याची इच्छा नसल्याने विशेष बाब म्हणून भविष्यात मुलाला वनसेवेत सामावून घेण्याची आणि रिना यांना तात्काळ पेन्शन चालू करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
पीडित कुटुंबाला पुन्हा मिळणार २५👇
देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य वनविभागाने वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ठार होणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना वनशहीद म्हणून शासन निर्णय काढून दर्जा दिला आहे.त्यानुषंगाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका महिन्याच्या आत पीडित कुटुंबाला पुन्हा २५ लाख रुपये सानुग्रह अनुदान तातडीने देण्याचे जाहीर केले आहे.
याप्रसंगी गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार,वडसा वन विभागाचे उपवसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण,चंद्रपूरचे मुख्यवन संरक्षक जितेंद्र रामगावकर, बल्लारपूर तहसीलदार कांचन जगताप,बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे,भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर पंदीलवार,विद्या देवाळकर,सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनकेश्वर मेश्राम व गावकरी उपस्थित होते.