Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीजंगली हत्तींचा कळप पोर्ला वनपरिक्षेत्राच्या नवरगाव परिसरात; गावकरी भयभीत..

जंगली हत्तींचा कळप पोर्ला वनपरिक्षेत्राच्या नवरगाव परिसरात; गावकरी भयभीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-वडसा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या पोर्ला वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाच्या नवरगाव जंगल परिसरासह अगदी गावशेजारी जंगली हत्तींचा कळप आज,मंगळवार ११ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान आढळून आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.सदर कळपात १० ते १२ जंगली हत्ती असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सायंकाळच्या सुमारास पोर्ला वरून नवरगाव ला जाणाऱ्या एका व्यक्तीला १० ते १२ जंगली हत्तींचा कळप गावशेजारी जातांना दिसून आला.त्यामुळे सदर व्यक्तीने याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली.गावकऱ्यांनी जंगली हत्तींना पळविण्यासाठी फटाके फोडून पळविण्याचा प्रयत्न केला.त्यातच जंगली हत्तींचा कळप जंगल परिसरात अजूनही ठाण मांडून असल्याची माहिती आहे.काही नागरिकांनी घटनेबाबत पोर्ला वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी यांना घटना घडताच माहिती देऊनही घटनास्थळी दाखल न झाल्याने गावकऱ्यांनी काहीकाळ संताप व्यक्त केला. जंगली हत्तींचा कळप मौशीखांब-बेलगाव जंगल परिसरातून नवरगाव जंगल परिसरात दाखल झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.जंगली हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा; अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

भोंदूबाबाच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे उघड होताच अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.विधीच्या नावाने अनेक उच्चभ्रू महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला ताब्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!