Sunday, September 13, 2026
Homeगडचिरोलीचुडाराम बल्हारपुरे यांच्या 'जत्रा घडली नागोबाची' या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.....

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.राष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराकरीता मराठी साहित्य प्रकारात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित ‘जत्रा घडली नागोबाची ‘ या लोकनाट्यास यंदाचे नाट्यलेखनाचे स्व.राजाराम डाकवे(तात्या)साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व संस्थापक डॉ.संदीप डाकवे,उपाध्यक्ष आप्पासाहेब निवडूंगे व सचिव रेश्मा डाकवे यांनी कळविले असून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील,मौजा-डाकेवाडी(काळगाव)येथे येत्या,सोमवार २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र,व सन्मानपत्र असे आहे.
विशेष म्हणजे,या नाटकास यापूर्वी साहित्य विहार संस्था,नागपूर यांचा डॉ.प्रज्ञा निनावे पुरस्कृत उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२५,(२)अ.भा‌.मातोश्री जिजाऊ परिवर्तन सामाजिक शिक्षण संस्था,गोंदिया यांचे नटसम्राट पुरस्कार-२०२६,(३)यशदा पुणे,संवाद पुणे,पुणे महानगर पालिका व मराठी भाषा संवर्धन समिती,पुणे यांचे उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार-२०२६.(४)शिवांजली साहित्यपीठ,चाळकवाडी(ता. जुन्नर,जि.पुणे)यांचा स्व.सयाजी चाळक स्मृती उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२६ व (५)महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा-दामाजीनगर यांचा शहिद राजकुमार ठोंबरे स्मृती उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२६ असे पाच पुरस्कार प्राप्त झाले असून यंदाचा हा सहावा पुरस्कार आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल सत्यवान मंडलीक(साहित्यिक),प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे,यादव गव्हाणे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम, प्रा.डॉ.योगीराज नगराळे,नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर,डॉ.दिपक चौधरी,रमेश निखारे, मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर(प्रकाशक),
नाट्यश्री तसेच झाडीपट्टीचे कवी,साहित्यिक व कलावंतांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!