- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गोंदिया येथील संथागार सामाजिक सभागृहात मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्जुनी/ मोरगाव या संस्थेच्या वतीने १ फेब्रुवारीला झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य संमेलनाचे वतीने दरवर्षी राज्य स्तरीय उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येते व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना संस्थेच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
राज्य स्तरावर अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यावर्षी अनेक साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता.त्यात मराठी नाट्यवाड्.मय साहित्य प्रकारात नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित व नाट्यश्री निर्मीत जत्रा घडली नागोबाची या नाटकास यंदाचा उत्कृष्ट नाट्यलेखनाचा ‘नटसम्राट पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला.
गोंदिया येथील संथागार सभागृहात झालेल्या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय निंबेकर,प्रसिद्ध साहित्यिक प्रा. मिलिंद रंगारी,झाडीबोली साहित्यिक मुरलीधर खोटेले, इंद्रकला बोपचे यांचे हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष व साहित्यिक प्रा.छाया बोरकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, शाल,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल पद्मश्री डॉ. परशुराम खुणे,प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे,रमेश निखारे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम, प्रा.डॉ.योगीराज नगराळे,नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर,डॉ.दिपक चौधरी,प्रा.नवनीत देशमुख(साहित्यिक),मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर(प्रकाशक)यांचेसह इतर साहित्यिक तथा कलावंतांनी अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
- Advertisement -

