Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीचुकीची मीटर रीडिंग,वीज बिलात वाढ; असे वाटल्यास महावितरणशी थेट करा संपर्क

चुकीची मीटर रीडिंग,वीज बिलात वाढ; असे वाटल्यास महावितरणशी थेट करा संपर्क

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- आपल्या वीज बिलात वाढ झाली,आपल्या विजेच्या मीटरचे रीडिंग चुकीचे घेतले अशी शंका आपल्याला आल्यास आता थेट वीज कंपनीला फोन करण्याची मुभा वीज ग्राहकांना आहे.कारण वीज ग्राहकांनी आपल्या विजेच्या मीटरच्या रीडिंगबाबत तक्रार केली; तर एजन्सीचा माणूस न येता थेट कंपनीचा माणूस आपल्या दारात उभा राहून आपली तक्रार सोडविणार आहे.

विजेच्या मीटर रीडिंगसह अनेक तक्रारी सातत्याने प्राप्त होत असतात.मुळात महावितरण विजेच्या मीटरचे रीडिंग घेत नाही.यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.समजा एजन्सीच्या माणसाने विजेच्या मीटरचे रीडिंग चुकीचे घेतल्या नंतर

वीज ग्राहकाने याबाबत तक्रार केली तर यातच खूप वेळ जातो.थकबाकी वाढत जातो.फोटो मीटर रीडिंगसाठी स्वतंत्र मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे.रीडिंग घेण्याची प्रक्रिया सोपी व वेगवान केली आहे.प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीला चांगला मोबदला दिला जातो.तरीही मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत आहेत.मात्र, आता काहीच खपवून घेतले जाणार नसल्याने अश्या काही तक्रारी असल्यास थेट विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीला फोन करून समस्याचे निराकरण करता येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!