Thursday, September 17, 2026
Homeजळगावचिमुकल्यासह महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.!

चिमुकल्यासह महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जळगाव :-सर्वत्र गणेशोत्सवाचा आनंद साजरा होत असतांनाच जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका ३० वर्षीय विवाहितेने आपल्या अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यासह गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारच्या सायंकाळी जळगाव शहरातील दशरथनगर परिसरातील तळेले कॉलनीत उघडकीस आली.हेमांगी निखिल महाजन वय ३० वर्षे व शौर्य निखिल महाजन वय ४ वर्षे अशी मृत माय-लेकाची नावे आहेत.मृत हेमांगी महाजन यांचे माहेर जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील बांभोरी गाव  असून,त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे.त्यांचे पती निखिल महाजन हे भारतीय सैन्यदलात कार्यरत असून सध्या राजस्थान येथे सेवा बजावत आहेत.तर त्यांचे दीर तळेले कॉलनीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत.
घटनेपूर्वी घरात गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना आणि पूजेची तयारी सुरू होती.घरातील सर्व सदस्य पूजेच्या गडबडीत असतांना हेमांगी महाजन या मुलाला घेऊन खोलीत गेल्या.पूजेची वेळ झाल्याने कुटुंबीय त्यांना बोलावण्यासाठी गेले असता खोलीचा दरवाजा आतून बंद होता.बराच वेळ आवाज देऊनही आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला.कुटुंबीयांनी तातडीने शनिपेठ पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दार उघडून पाहिले असता माय-लेकाने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले.दोघांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले,मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.पोलिसांनी पुढील तपास सुरू करून आत्महत्येचे कारण व इतर बाबींचा तपास सुरू केला आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पारंपरिक कारागीर व शिल्पकारांचा टूल किट व कर्ज मंजुरी पत्र वाटप सोहळा’ संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या श्रमाला उत्पादकतेची जोड देणे आवश्यक आहे.पारंपरिक कारागीर,शिल्पकार आणि असंघटित...

सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा सफल; मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू केलेल्या उपोषणाची सांगता तब्बल २० व्या दिवशी संपुष्टात आल्याने...

आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचा कुरखेडा शहर विचार मंचाच्या वतीने गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ.जे.पी.नाईक आदर्श प्राचार्य’ पुरस्कार प्राप्त करून श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांनी गडचिरोली...

पोलीस हवालदार अडकला एसीबीच्या जाळ्यात; पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका पोलीस हवालदारास तब्बल ४० हजाराची लाच घेतांना नागपूरच्या एसीबी पथकाने पोलिस ठाण्याच्या आवारातच रंगेहाथ पकडले.सचिन तायडे असे लाचखोर पोलिस हवालदाराचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!