Sunday, August 9, 2026
Homeगोंदियाचित्तथरारक घटना.! शौच करून परतणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला..

चित्तथरारक घटना.! शौच करून परतणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-विदर्भातील वर्धा सोडले तर नागपूर,भंडारा, चंद्रपूर,गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने मानव-वन्यजीव संघर्ष पहावयास मिळते.वन्य प्राण्यांकडून कधी वाहनांवर झडप तर कधी शेतकऱ्यांना ठार केले जात आहे.अश्यातच गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे एक चित्तथरारक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.बिबट्याने संधी साधत एका चार वर्षीय चिमुकलीवर हल्ला चढवून मानेला पकडत तिला फरफटत नेले.त्यातच चिमुकलीचा रडण्याचा आवाज ऐकून कुटूंबीय व शेजारील नागरिक धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.पण,बिबट्याने चिमुकलीची मान पकडून फरफटत नेल्याने तिच्या मानेला दुखापत होऊन,यात गोठणगाव येथील चार वर्षीय युक्ता मारोती निखारे ही चिमुकली जखमी झाली.सदरची घटना दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी रात्री नऊच्या दरम्यान घडली. घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
अधिक माहिती अशी की,घटनेच्या दिवशी चार वर्षीय युक्ताला शौच लागल्याने ती घरामागील शौचालयात गेली होती.अशातच युक्ता शौच करून घरी परत जात असतांना बिबट्याने अचानकपणे तिच्यावर हल्ला चढवला व जबड्यात मान पकडुन काही अंतरावर फरफटत नेले.त्यातच युक्ताचा रडण्याचा आवाज ऐकू येताच कुटुंबीयांना बिबट्या दिसला.त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली.कुटुंबीयांचा ओरडण्याचा आवाज येताच शेजारीलही नागरिकांनी धाव घेत सर्वांनी मोठमोठ्याने आवाज केला.त्यामुळे बिबट्याने युक्ताला सोडून देत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.मात्र, बिबट्याने युक्ताची मान पकडून फरफटत नेल्याने तिच्या मानेला दुखापत झाली.यानंतर कुटुंबीयांनी लगेच जखमी युक्ताला गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.घटनेची माहिती वनविभागास कळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.घटनेने नागरिक भयभीत झाले असून येत्या काळात एखादी अनुचित घटना घडू नये, याकरीता वनविभागाने वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!