Sunday, April 19, 2026
Homeपुणेचारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा चक्क पत्नीनेच काढला काटा..!

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा चक्क पत्नीनेच काढला काटा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-ऑटोमोटिव्ह,आयटी आणि उत्पादन उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आज,शुक्रवार २४ ऑक्टोंबरच्या पहाटे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून चक्क पत्नीनेच पतीचा काटा काढून गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले आहे.प्रकरणी २८ वर्षीय आरोपी पत्नीस चिंचवड पोलिसांनी अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.चैताली नकुल भोईर वय २८ वर्षे,रा.भोईर कॉलनी,चिंचवड असे आरोपी पत्नीचे नाव असून नकुल आनंद भोईर वय ४० वर्षे असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.सदरची घटना आज शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास माणिक कॉलनीतील महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालयाच्या इमारतीत घडली.पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होता. नकुल हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन वाद घालायचा.आज पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.भांडण सुरू असतांनाच चैताली हिने रागाच्या भरात पती नकुल भोईर यांचा कापडाने गळा आवळून खून केला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चैताली भोईरला तात्काळ ताब्यात घेत प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.नकुल भोईर हे सामाजिक कार्यकर्ते होते.दोघेही साडी सेंटरचा व्यवसाय करायचे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पत्नीला नगरसेवक बनविण्याची त्यांची इच्छा होती.पण,क्षुल्लकशा कारणासाठी जीव गमावावा लागला.त्यांना ५ वर्षीय आणि २ वर्षीय दोन चिमुकले असून इकडे आई कारावासात जाणार तर वडील कायमचे सोडून गेल्याने दोन्ही मुले आई-वडिलांविना पोरकी झाली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!