उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- विदर्भाची काशी म्हणून नावलौकीक असलेल्या तिर्थक्षेत्र मार्कंडादेव नगरीत; चामोर्शी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे यांच्या अगमना प्रित्यर्थ जय संतोषी माँ शक्तिपीठ संस्थानचे मठाधीश श्रीमंत संतोष सुरपाम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
चामोर्शी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष बुरांडे उत्कृष्ट लोक सेवक म्हणून चामोर्शी तालुक्यात त्यांची ख्याती आहे.गोरगरीब,सर्वसामान्य, जनतेची तळमळीने कामे करणे व थेट जनतेशी संवाद साधून समस्यांचे निराकरण करणे; असे व्यक्तिमत्व असल्याने संस्थानचे मठाधीश,पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांद्वारे पुषपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी संस्थानचे मठाधीश श्रीमंत संतोष सुरपाम, रत्नमाला सुरपाम,छबिलदास सुरपाम,अल्का सुरपाम,देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी कालीदास बन्सोड,ए.एस.आय.हिरालाल जुनघरे,गजानन बारसागडे,नरेद्र सोमनकर,अय्याज शेख,चंद्रकांत कुनघाडकर,अमीत साखरे,वर्षा सुरपाम,क्रीष्णा सुरपाम,राजु मोगरे,आदि मान्यवर उपस्थित होते.