उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली (चामोर्शी):- जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये दीवसेंदिवस वाढ होत चालली आहे.शिकारी रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा बंद करून वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी सापळे लावित असतात.मात्र याकडे वनविभाग व विद्युत विभागाचे दुर्लक्ष करीत असल्यानेच वन्यप्राण्यांच्या शिकारींचे वाढले प्रमाण आहे.
घनदाट जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्याही अधिक आहे.मात्र त्या तुलनेत शिकारीचे प्रमाणही खूप वाढले आहे.
कारवाई करूनही शिकार थांबेना चामोर्शी तालुक्यात अधिकारी व कर्मचारी अवैधरित्या वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. मात्र वन्यप्राण्यांची शिकार करणे थांबलेले नाही. चामोर्शी तालुक्यातील शिकाऱ्यांवर कडक कारवाई करून वन्यप्राण्यांची शिकार थांबवावी;अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.