उद्रेक न्युज वृत्त
अहमदनगर :-जिल्ह्यातील कोपरगाव येथील तहसिलदाराने शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबर व उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णांबरोबर गैरवर्तन केले.मद्य धुंद अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात गेले होते.त्यांचा कुठलाही नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल नव्हता.त्यांनी केलेले हे गैरवर्तन अत्यंत चुकीची आहे. त्यांच्या पदाला न शोभणारे हे वर्तन असून,जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असून,सोमवार पर्यंत त्यांना अटक न झाल्यास अहमदनगर जिल्ह्यासह सर्व ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुरेखा आंधळे यांनी दिला.कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तन केले.कोपरगाव येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे साडेपाच वाजता ते आले होते.त्यांनी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांची गैरवर्तन केले.तसेच जातीवाचक शिवीगाळही केली.त्याचबरोबर कामावर हजर असलेल्या शिपायाला रुग्णालयाबाहेर काढले. मद्यसेवन करून त्यांनी हे गैरवर्तन केले.याप्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदारांनी केलेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी व परिचारिका निदर्शने करत तहसीलदारांच्या अटकेची मागणी केली.आंदोलनात महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटना,वैद्यकीय अधिकारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना,मध्यवर्ती कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.