Thursday, June 4, 2026
Homeनागपूरचक्क उशीखाली कोब्रा नाग साप बघून अंगावर वीज चकाकल्यागत झाले..!

चक्क उशीखाली कोब्रा नाग साप बघून अंगावर वीज चकाकल्यागत झाले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पावसाच्या दिवसात थंडाव्यामुळे सरपटणारे प्राणी केव्हा घरामध्ये आसरा घेणार,हे सांगताच येत नाही.सर्व साप परवडले,पण तीन ते चार साप अतिविषारी असल्याने ते न परवडणारे असून वेळेवर उपचार न झाल्यास एखाद्याचा मृत्यू होत असतो.अती विषारी सापांमध्ये किंग कोब्रा,नाग,घोणस,दांड्या काळीचा साप हे सर्वात जास्त विषारी असतात. यातील एखादा साप घरात आढळून आल्यास आणि तोही आपण ज्यावर झोप घेतो,अश्या ठिकाणी नजरेस पडला तर..भंबेरी उडाल्याशिवाय राहणार नाही.अशीच घटना काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नागपुरातील महाजनवाडी भागात घडली. जयस्वालनगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात चक्क विषारी कोब्रा साप बेडवर चढून उशाखाली दडला होता.सुदैवाने झोपण्यापूर्वी अंथरूण तपासल्यामुळे होणारा भयावह प्रकार टळला.
माहितीनुसार,महाजनवाडीच्या जयस्वालनगरात राहणारे पंकज कुवरे यांच्या घरात केव्हा तरी कोब्रा शिरला असेल.काल गुरुवारी सायंकाळी झोपण्यापूर्वी अंथरूण झटकावे म्हणून त्यांनी उशी उचलली आणि अंगावर वीज चकाकल्यागत ते गतीने मागे झाले. अंथरुणावर अतिविषारी कोब्रा चढला होता.अतिशय घाबरलेल्या कुवरे यांनी संपर्कातील विदर्भ सर्पमित्र समिती सदस्य आकाश मेश्राम यांना फोन केला. माहिती मिळताच आकाश आणि अविनाश लोकरे, राहुल सिंग हे कुवरे यांच्या घरी पोहोचले.एका उशीमधून निघून दुसऱ्या उशीत गेलेल्या नाग सापाला त्यांनी अतिशय शिताफीने पकडले.एखादी अनुचित घटना घडण्यापूर्विच सापाला पकडण्यात आल्याने पंकज कुवरे यांच्या कुटुंबीयांनी सर्प मित्रांचे आभार व्यक्त करत सुटकेचा निःश्वास सोडला.
  •          अशी घ्या खबरदारी👇
आता पावसाळा सुरू होत आहे.अशावेळी जमिनीतील विषारी जीव बाहेर पडतात.त्यात विषारी साप,विंचू किंवा गोम आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश असतो.हे प्राणी कधी जुते,चप्पल किंवा घरात शिरण्याची शक्यता असते.त्यामुळे या वस्तू वापरतांना काळजी घेण्याची गरज आहे.साप हे भिंतीला लागून असलेल्या बेडवरसुद्धा चढू शकतात.त्यामुळे सर्पदंश टाळण्यासाठी अंथरूण भिंतीला चिकटून अजिबात टाकू नका,मध्यभागी टाका आणि शक्य असेल तर मच्छरदाणी अंथरूणाखाली दाबून ठेवा,जेणेकरून साप अंथरूणात शिरणार नाही,सर्पदंश किंवा प्राणीदंश झाल्यास तात्काळ सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!