Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तग्रामीण राजकारणात शांतता; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर..

ग्रामीण राजकारणात शांतता; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यामुळे ग्रामीण भागातील तापलेले राजकारण पार कोमेजून गेले आहे.राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण निश्चित करतांना काही ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली होती.या मर्यादेचे उल्लंघन झाल्याने न्यायालयाने यापूर्वीच २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती.दरम्यान,ज्या ठिकाणी ही मर्यादा पाळली गेली होती,अशा १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या आहेत. अश्यातच आता आज,सोमवार २३ फेब्रुवारी रोजी राहुल रमेश वाघ विरुद्ध केंद्र आणि राज्य सरकार या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या संस्थांमध्ये निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत मनाई केली आहे.
राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात बाजू मांडली. “सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून उर्वरित निवडणुका घेण्यास परवानगी द्यावी,” अशी विनंती त्यांनी केली.मात्र, ५० टक्क्यांच्या आरक्षणाबाबत जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही,तोपर्यंत अशा प्रकारे परवानगी देता येणार नाही,असे स्पष्ट करत न्यायालयाने राज्य सरकारला दिलासा देण्यास नकार दिला.न्यायालयाच्या या निर्णयाने राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ग्रामीण राजकारणात मोठी शांतता पसरली आहे.जोपर्यंत ५० टक्के आरक्षण मर्यादेचा कायदेशीर तिढा सुटत नाही,तोपर्यंत या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर प्रशासकांचेच वर्चस्व राहण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!