Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे ५४ वर्षीय ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक)प्रल्हाद एन.पाटील यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात ग्रामसेवकांनी तीव्र संताप व्यक्त करून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने राज्यातील सर्व ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय घेतलेला असतांनाच आता ग्रामसभांच्या संख्येला मर्यादा घालून वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्यात यावी व तिला विनामूल्य पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा,या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने विविध जिल्ह्यात आंदोलने करण्यात येत आहेत.विशेष म्हणजे,महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार वर्षातून किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.अश्यातच संघटनेने शासनाकडे ग्रामसभा आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात चार प्रमुख मागण्या केल्या आहेत.त्यात, वर्षातून केवळ एकच मुख्य संवैधानिक ग्रामसभा घेण्यात यावी.इतर सभा केवळ विशेष शासन निर्णयानुसार घेण्यात याव्यात.ग्रामसभेत ऐनवेळी नको ते विषय मांडून अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याच्या प्रकारांना कायदेशीर बंदी घालावी.नियमितपणे जमाखर्च सादर होत असतांना ऐनवेळी मागील पाच वर्षांचा जमाखर्च मागण्याच्या पद्धतीवर मर्यादा आणावी आणि प्रत्येक ग्रामसभेला अनिवार्य आणि पूर्णपणे विनामूल्य पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा,या मागण्यांचा समावेश आहे.मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असाही इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!