उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे.तापमानात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने मागील चार-पाच दिवसांपासून गारठा जाणवू लागला आहे.थंडीला सुरुवात झाल्यानंतर लगेच शहरात उबदार कपड्यांची दुकाने थाटली गेली.वाढत्या थंडीमुळे सर्दी,खोकला,डोकेदुखीसारख्या आजारांमध्ये वाढ होत आहेत.थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांच्या खरेदीकडे जिल्हावासींचा कल वाढल्याने दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे.दुपारी उन्हाची काहीशी तीव्रता जाणवत असली तरी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत थंडीचा गारवा जाणवतो.यंदा पाऊस अधिक झाल्याने थंडीत वाढ होण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवली जात आहे.परतीचा पाऊसही यंदा लांबला.त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपासून थंडीत वाढ झाली आहे.हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे,ओठ फाटणे अशा त्वचाविकारांच्या रुग्णांचीही गर्दी दवाखान्यात दिसून येत आहे. अस्थमा,न्यूमोनिया व संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे.दोन वर्षांखालील बालकांना न्यूमोनियाचा त्रास होत आहे.या काळात आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.त्वचेची काळजी घेण्यासाठी गरम कपडे घालावेत व नागरिकांनी थंडी पासून बचाव करावे.

