उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- झटपट श्रीमंत होण्याच्या नादात पाच झणांनी शक्कल लढवून गावात असलेल्या हनुमान मंदिराच्या जमिनीमध्ये गुप्तधन काढण्याकरिता गेले असता गावकऱ्यांना माहिती पडताच पाचही झणांना तुरुंगवासाची हवा खावी लागणार आहे.नागपुरातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर प्रकार घडला आहे.
नागपुरातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावंगी देवळी गावात असलेल्या हनुमान मंदिराच्या जमिनीमधे गुप्तधन असल्याची कानकुन सुरू होती.त्यामुळे झटपट श्रीमंतीच्या नादात पाचही आरोपींनी शक्कल लढवली; त्यानुसार रविवारी रात्री पाच आरोपींनी पायाळू महिलेला सोबत घेत भानामतीचे साहित्य घेत हनुमान मंदिर परिसर गाठला आणि तिथे खोदकामाला सुरुवात केली.पाच जणांच्या या कृत्याची माहिती गावातील काही लोकांना मिळळी.त्यानंतर गावकरी घटनास्थळी दाखल झाले.खोदकाम करतेवेळी शंकर सावरकर, विठ्ठल सोमांकर,बाबा टेंभूर्कर,वंदना गडकर,संदीप सहारे यांना अघोरी पूजा करतांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले.
गावकऱ्यांनी घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी घटनस्थळ गाठून अघोरी पूजेच्या साहित्यासह आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुप्तधन मिळवण्यासाठी भानामती करीत असल्याची कबुली दिली.पोलिसांनी हर्षल सोनावणे यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपी विरोधात महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.