उद्रेक न्युज वृत्त
बुलडाणा :- जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या शहराध्यक्षाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
गर्लफ्रेंडने धोका दिला म्हणून त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले.गजानन गुरव असे २६ वर्षीय युवकाचे नाव आहे.गावातीलच एका युवतीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. सदर युवकाच्या गर्लफ्रेंडचे दुसऱ्याच तरुणासोबत सूत जुळले होते.त्यामुळे,नैराश्यातून गजानन गुरव याने खंडोबा मंदिर परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आत्महत्येपूर्वी गजानन गुरवने व्हॉट्स ॲपला स्टेटसही ठेवले.यात त्याने आत्महत्येचे कारण सांगितले.
आपल्या प्रेयसीने प्रेमात धोका दिला असल्याचे गजानने आपल्या व्हॉट्स ॲप स्टेटस आणि इंस्टाग्रामच्या स्टोरीवर व्हिडिओ ठेवत सांगितले. यानंतर त्याने आत्महत्या केली आहे.आपल्या मित्र परिवाराला भावनिक स्टेटस सुद्धा गजाननाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होते.त्यामुळे गर्लफ्रेंडने प्रेमात धोका दिल्याने “अपनी राणी किसी की दीवानी हो गई” असे म्हणत गजानन गुरव नामक या युवकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.सदर घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
(साभार – न्युज १८ लोकमत)