- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीदरम्यान उपचारार्थ दाखल झालेल्या गर्भवतीला वेळीच उपचार न करता रुग्णालयात तात्काळ ठेवल्याने गर्भवतीचा मृत्यू झाला.सदरची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता घडली.याला कोरंबीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश बारसागडे सह डॉ.आर्या वैद्य हेच जबाबदार असल्याचा ठपका ठेवून काल,बुधवारी सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात गावातील शेकडो महिला,पुरुषांनी ठिय्या आंदोलन करून संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्याची तसेच मृतक महिलेच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत करण्याची मागणी केली.जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; अशी भूमिका घेतली होती.त्यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
कोरंबीटोला येथील धनराज सुरत नेताम यांची पत्नी वसंता नेताम वय ३३ वर्षे ही दुसऱ्यांदा गर्भवती होती. पहिली मुलगी डिंपल तीन वर्षे नऊ महिन्यांची आहे. अचानकपणे वसंताला मंगळवारी प्रसव वेदना सुरू झाल्या.त्याच दिवशी सकाळी साडेसहा वाजता गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी तिला दाखल करण्यात आले.जननी शिशु सुरक्षा योजना अनुक्रमांक ३६८ वर त्या गरोदर मातेची पीएससीच्या
रजिस्टरला नोंद करण्यात आली.दुपारी चार वाजेपर्यंत त्या गरोदर मातेला ताटकळत पीएससीमध्ये ठेवल्याचा आरोप आहे.यावेळी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळीच उपचार केले नाही.वेळ मारून नेऊन त्या गरोदर मातेला तब्बल दहा तास उपचाराविना ठेवल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. प्रकृती धोक्याबाहेर जात असल्याचे पाहून पीएससीच्या रुग्णवाहिकेने अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.तिथे सात वाजेपर्यंत प्राथमिक उपचार करून त्या गरोदर मातेला गोंदियाला हलविण्यात आले.गोंदियाला नेत असताना रात्री ८ वाजेच्या दरम्यान वाटेतच तिचा मृत्यू झाला.
- Advertisement -