Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीगणपती उत्सवादरम्यान लाभार्थ्यांना मिळणार आनंदाचा शिधा…

गणपती उत्सवादरम्यान लाभार्थ्यांना मिळणार आनंदाचा शिधा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सणासुदीच्या दिवसांत अंत्योदय व प्राधान्यक्रम रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.या किटमध्ये एक किलो रवा,एक किलो साखर, एक किलो सोयाबीन तेल,एक किलो चणाडाळ आदी साहित्याचा समावेश आहे.जिल्ह्यात गणपती उत्सवादरम्यान लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण केला जाणार आहे.

सामान्य गरीब नागरिक उपाशी राहू नयेत,यासाठी पुरवठा विभागाद्वारे रेशन दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण केले जाते.याशिवाय सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्य शासनाच्यावतीने आनंदाचा शिधा वितरण केला जातो.केवळ शंभर रुपयांमध्ये रवा,साखर व चणाडाळ आणि प्रत्येकी एक किलो तेल लाभार्थ्यांना दिले जात आहे.त्यामुळे यंदा गणपती उत्सव उत्साहात साजरा करता येणार आहे. आनंदाचा शिधा अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे.

जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थी रेशन कार्डधारक संख्येनुसार जिल्हा पुरवठा विभागाद्वारे मागणी नोंदविण्यात येत असते.आनंदाचा शिधा किटचा गोदामात पुरवठा झाल्यानंतर १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात येणार आहे.

सणासुदीच्या दिवसांत महागाईची झळ गोरगरीब कुटुंबांना पोहोचू नये, यासाठी रेशन दुकानातून अंत्योदय व प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. यावर्षी गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळाला होता. आता गौरी,गणपतीच्या निमित्ताने सवलतीच्या दरामध्ये रवा,साखर,चणाडाळ व सोयाबीन तेल दिले जाणार आहे.

गौरी,गणपती सणानिमित्त अंत्योदय व प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधामध्ये एक किलो रखा, एक किलो साखर,तेल,एक किलो चणाडाळ आदी वस्तू मिळणार आहेत.

गौरी,गणपतीनिमित्त १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.यामध्ये अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील कार्डधारकांना हा लाभ मिळणार आहे.१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे. जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटूंबांचे सण उत्सव उत्साहात साजरे होणार आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!