Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली शहरात वाहतूक निर्बंध लागू; चार मार्ग मध्यरात्रपर्यंत बंद..

गडचिरोली शहरात वाहतूक निर्बंध लागू; चार मार्ग मध्यरात्रपर्यंत बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गडचिरोली शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात होणाऱ्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने उद्या,मंगळवार १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत गडचिरोली-आरमोरी,चंद्रपूर,धानोरा व चामोर्शी या मार्गावरील वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत.
जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ व ११६ अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.या कालावधीत संबंधित मार्गावर दोन्ही बाजूंनी अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.मात्र रुग्णवाहिका,प्रवासी बसेस तसेच पाणीपुरवठा,महावितरण,दुरसंचार व रस्ते दुरुस्तीशी संबंधित अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
सदर आदेशाचे काटेकोर पालन करावे,अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर भारतीय दंड संहिता १८६० व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये कारवाई करण्यात येईल,असेही जिल्हादंडाधिकारी पंडा यांचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!