Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री मासिक कविता स्पर्धेतील चौथ्या सत्राचा निकाल जाहीर..

गडचिरोली नाट्यश्री मासिक कविता स्पर्धेतील चौथ्या सत्राचा निकाल जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने मासिक उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर महिन्याला ही स्पर्धा विनाशुल्क घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत कवींना दिलेल्या विषयांवर कविता सादर करायची असून या कवितांमधून तीन उत्कृष्ट कवितांची निवड करण्यात येते.या कवितांना मासिक सर्वोत्कृष्ट कविता व कवीला सर्वोत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.कविता संवर्धन व वाचनसंस्कृती जोपासणे हा स्पर्धेमागचा उद्देश असल्याने पुरस्कृत कवींना पुरस्कार म्हणून पुस्तके व आकर्षक प्रमाणपत्राने नाट्यश्री वार्षिक महोत्सवात मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे चौथे सत्र नुकतेच पार पडले असून या सत्राकरीता सिमोल्लंघन,भाऊबीज,तसेच महापूर असे तीन विषय देण्यात आले होते.यात २७ कवींनी सहभाग नोंदवून दिलेल्या तीन विषयांवर एकूण ५३ कविता सादर केल्या होत्या.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून पुसद (जि.यवतमाळ),येथील बाबुलाल पुराजी राठोड यांच्या सिमोल्लंघन या कवितेस, सिंदेवाही(जि.चंद्रपूर) येथील सौ.प्रिती ईश्वर चहांदे यांच्या भाऊबीज या  कवितेस व सुभाष धाराशिवकर,पुणे यांच्या महापूर या कवितेस सर्वोत्कृष्ट पुरस्कार घोषित करण्यात आले आहे; असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.या स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध समीक्षक प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर चंद्रपूर, प्रसिद्ध संशोधक प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी केले.कवींच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत प्रामुख्याने बाबुलाल पुराजी राठोड,खेमदेव हस्ते,आत्माराम विठ्ठल बरडे,पुनाजी कोटरंगे,नथ्थुजी चिमुरकर,पी.डी.काटकर,संजय कुनघाडकर,प्रिती ईश्वर चहांदे,गायत्री गेडाम,सोनाली रायपुरे,अशोक कांबळे, सुभाष धाराशिवकर,शैला चिमड्यालवार,सुनील बावणे, वसंत चापले,राजेंद्र यादवराव सोनटक्के,राजरत्न पेटकर,उकंडराव नारायण राऊत,पुरुषोत्तम दहिकर,रेश्मा बावणे,डॉ.चंद्रकांत लेनगुरे,सपना कन्नाके,सुरेखा बोरकर, सुजाता अवचट,प्रा.सरिता बुटले,रोशनी दाते इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील वार्षिक कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!