- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोली च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.
या उपक्रमाचे अडतिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी सुनिल चडगुलवार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “वेदना ” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
सुनिल चडगुलवार हे गडचिरोली येथील रहिवासी असून ते प्रसिद्ध नाट्य कलावंत,नाटककार,दिग्दर्शक व नवोदित कवी आहेत.त्यांच्या ‘राजीनामा’ या एकांकिकेला अनेक पारितोषिके प्राप्त झालेली असून नाट्यश्रीच्या एकपात्री अभिनय स्पर्धेत सलग तीन वर्षे त्यांनी पुरस्कार पटकावले आहे.स्थानिक राजवी प्राडक्शनचे संचालक असून गडचिरोली तालुका झाडीपट्टी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.नुकतेच कविता लेखनास त्यांनी प्रारंभ केला आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.अरुण बुरे,दादा चुधरी, दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अडतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा.पी.एस. बनसोडे,तुळशीराम उंदीरवाडे, स्वप्नील बांबोळे, जयराम धोंगडे,अजय राऊत,गणेश रामदास निकम, संगीता ठलाल,सुभाष धाराशिवकर,रोहिणी पराडकर, सोनाली रायपुरे,पुनाजी कोटरंगे,वंदना सोरते,प्रभाकर दुर्गे,ज्योत्स्ना बन्सोड,मुर्लीधर खोटेले,जयराम धोंगडे,यामिनी मडावी, विलास जेंगठे,राजेंद्र यादवराव सोनटक्के,रेखा दिक्षित,लता शेंद्रे,शैला चिमड्यालवार,उकंडराव नारायण राऊत,नरेंद्र गुंडेली,ज्योती म्हस्के, वामनदादा गेडाम,प्रिती ईश्वर चहांदे,मधुकर दुफारे, सुनिल चडगुलवार,केवळराम बगमारे,खुशाल म्हशाखेत्री,सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.अडतीसाव्या सत्रातील पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
- Advertisement -

