उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- नगर परिषद गडचिरोलीच्या मुख्य मार्गांवरील वरील पथ दिवे इंदिरा गांधी चौक,चामोर्शी मार्ग ते शासकिय विज्ञान महाविद्यालया पर्यंतची पथ दिवे गेल्या एक वर्षापासुन बंद अवस्थेत आहेत. अशातच शहरातील नागरिकांना अंधाराचा व इतर त्रासदायक सामना करावा लागत असल्याने गडचिरोली नगर परिषद डबघाईस आली असेल तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मुख्य मार्गांवरील नवीन सुरू पथ दिवे घेऊन देण्याची तयारी रिपाई नेते प्रा.मुनिश्वर बोरकर व इतर कार्यकर्त्यांनी दर्शविली आहे.मागील दोन महिन्यांपूर्वी जिल्हा कॉम्पलेस मार्गावरील पथ दिवे बंद होते.परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या धसक्याने सदर मार्गावरील पथ दिवे सुरु झाले.त्या वेळेस चामोर्शी मार्गावरील सुध्दा बंद दिवे सुरु होतील असा आशा वाद व्यक्त करण्यात आला होता.मात्र अजून पावेतो चामोर्शी मार्गावरील पथ दिवे बंदच अवस्थेत आहेत.रामनवमी,हनुमान जयंती व डॉ. आंबेडकर जयंती सारखे महत्त्वाचे उत्सव असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. सदर मार्गावर पहाटे ४ वाजताच्या सुमारास शहरातील नागरिकांची मार्निंग वॉक सुरु होते.परंतु नागरिकांना मुख्य मार्गावरील अंधारामुळे चाचपत-चाचपत वाट शोधून जावे लागते.सदर मार्गांवर तिन लाईटच्या डिप्या असून त्या नादुरूस्त आहेत की काय? नगर परिषदेकडे पैसे नाहीत काय? असा सवाल शहरातील नागरिक करीत आहेत.
नगर परिषदेचे कर्मचारी कर वसुलीसाठी सकाळपासुनच घरोघरी फिरतांना दिसून येतात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी मार्गावरील बंद स्वरूपातील पथ दिवे त्वरीत दुरुस्तीकडे लक्ष घालावे किंवा पैसे नसतील तर रिपाईचे कार्यकर्ते दान करायला तयार आहोत; अशी खोचक सुचना रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केली आहे.