उद्रेक न्युज वृत्त
सत्यवान रामटेके
गडचिरोली :- जिल्ह्यात ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र वा शिक्षण नसतांना सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याशी खेळून झोलाछाप बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट दिसून येत आहे.आरोग्य विभागातर्फे कारवाई शून्य केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर टांगला जातो आहे.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक व गोरगरीब जनता पैस्याअभवी वा तज्ञ डॉक्टरची फी परवडत नसल्याने गावातील वा शहरी भागातील डॉक्टरांकडे उपचाराकरिता जात असतात.मात्र ज्या डॉक्टरकडे रुग्ण जातात; असा डॉक्टर खरोखरच वैद्यकीय प्रमाणपत्रधारक नोंदणीकृत आहे किंवा नाही; तसेच जी डिग्री घेतली आहे; त्यात तो प्रावीण्य आहे की इतर उपचार करून फसवणूक करीत आहे.याची कल्पना रुग्णांना नसते.रुग्णही अंगाला हळद लावून घेत नसल्याने शैक्षणिक पात्रता वा इतर बाबींकडे दुर्लक्ष करून बोगस डॉक्टरांद्वारे तपासणी करून घेत असल्याने चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.बोगस डॉक्टर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दवाखाने थाटून झोलाछाप करून रुग्णांना चुना लावण्याचे काम करीत आहेत.बोगस डॉक्टरांवर कुणाचाही वचपा नसल्याने बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करतांना दिसून येतात.
काही बोगस डॉक्टर दवाखाने न थाटता फिरते पथक चालवून रुग्णांवर उपचार करतांना दिसून येतात.एखादेवेळेस रुग्णांची प्रकृती खालावल्यास हात वर करून मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला देत असतात.काही तालुक्यातील बोगस डॉक्टर मेडिकल दुकानाच्या आड डॉक्टरकी करून रुग्णांवर उपचार करण्याचे काम सुरू केले असल्याने कायद्याचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.अशा झोलाछाप बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाने अंकुश लावावा; अन्यथा ‘गल्लीत गोंधळ,दिल्लीत मुजरा’ झाल्याशिवाय राहणार नाही.