Wednesday, May 13, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार ४८ हजार लिटर केरोसीनचे वाटप..

गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार ४८ हजार लिटर केरोसीनचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून,गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार,राज्यशासनामार्फत गडचिरोली जिल्ह्यासाठी हे अतिरिक्त नियतन मंजूर करण्यात आले आहे.लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार केरोसीन उपलब्ध व्हावे,यासाठी तालुकानिहाय साठा वितरित करण्यात येणार आहे.गडचिरोली तालुक्यासाठी १२ हजार लिटर,तर चामोर्शी,धानोरा,सिरोंचा,आरमोरी, कुरखेडा आणि कोरची या तालुक्यांसाठी प्रत्येकी ६ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे.
अंत्योदय अन्न योजना(AAY)व प्राधान्य कुटुंब (PHH)शिधापत्रिकाधारकांना केरोसीन वितरणात प्राधान्य देण्यात येणार आहे.केरोसीन विक्रीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन उपलब्धतेनुसार इतर शिधापत्रिकाधारक कुटुंबांनाही केरोसीन वितरित करण्यात येईल.तसेच ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी उपलब्ध नाही,अशा कुटुंबांनाही उपलब्धतेनुसार केरोसीन मिळणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज डहारे यांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, स्वयंप्रकाश व दिवाबत्तीसाठी आवश्यक असलेले केरोसीन नजीकच्या केरोसीन दुकानदाराकडून प्राप्त करून घ्यावे व शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहशतवादविरोधी पथकाचे नागपूर,भंडारा,चंद्रपूरसह रज्याभरात छापे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दहशतवादविरोधी पथकाने आज,बुधवार १३ मे रोजी सकाळपासूनच राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा चालवला.पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मुंबईसह...

नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात  'फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार' वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या सोहळ्यात...

चक्क वाळू डेपोच्या सावंगी रेतीघाटात अवैध वाळू उपश्याचा खेळ..! – देसाईगंज महसूल अन् पोलीस विभाग निद्रावस्थेत; आम्ही सांगणार तेव्हाच डोळे उघडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात हल्ली रेती उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांचा ताबा तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात येणार...

उपराजधानीत मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीची(हनुमान)विराट आणि भव्य-दिव्य अशी मूर्ती तयार करण्यात येत असून नागपूरच्या कोराडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!