उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन २०२२-२३ वर्षाची रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८९ गावे असून रब्बी पिकाची गावे १४८ आहेत.त्यापैकी रब्बी गावामध्ये पीके नसलेली गावे ९४ आहेत.सदर रब्बी पिक असलेल्या गावापैकी ५० पैशाचे आत पैसेवारी असलेले रब्बी गावे ० असून ५० पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण रब्बी पिक असलेल्या गावांची संख्या ५४ आहे.अशा प्रकारे एकूण ५४ रब्बी पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे.गडचिरोली जिल्ह्याची रब्बी हंगाम २०२२-२३ या वर्षाची अंतीम पैसेवारी ही ०.६४ आहे.असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.