Monday, August 3, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी जाधव यांची बदली..

गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी जाधव यांची बदली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव नांदेड येथे बदली करण्यात आली असून आज,सोमवार ३ ऑगस्ट रोजी त्यांना गडचिरोली येथून कार्यमुक्त करण्यात आले. जाधव यांच्या जागी सध्या स्थायी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे राजेश येसनकर हे अतिरिक्त स्वरूपात गडचिरोली येथील पदभार सांभाळणार आहेत.दरम्यान,आज जाता-जाता गजानन जाधव यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे.त्यात, “गडचिरोलीमध्ये काम करण्याचा मला अविस्मरणीय अनुभव मिळाला. आपल्या सर्वांच्या मोलाच्या सहकार्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करतांना आत्मविश्वासाने काम करता आले आणि शासनाच्या विकासाभिमुख उपक्रमांची सकारात्मक बाजू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करता आला.या प्रवासात आपण दिलेले प्रेम, विश्वास आणि सहकार्य माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील.शासनाच्या आदेशानुसार आता माझी बदली नांदेड येथे झाली आहे.गडचिरोलीच्या आठवणी आणि आपला स्नेह सदैव माझ्यासोबत राहील.मनःपूर्वक धन्यवाद! आपला स्नेह आणि शुभेच्छा कायम लाभत राहोत” असे जाधव यांनी म्हटले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

तलावात बुडालेल्या तरुणाचा आज सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या धानोरी गावातील २२ वर्षीय तरुण काल रविवारच्या सायंकाळी गाव तलाव परिसरात आंघोळ करण्यासाठी उतरला असता क्षणात दिसेनासा झाल्याने परिसरात एकच...

सावधान..! तुमच्याही बँक खात्याचा होऊ शकतो सायबर फसवणुकीसाठी गैरवापर.. – नागरिकांनी आपले बैंक खाते,एटीएम कार्ड,पासबुक कुणालाही वापरण्यासाठी देऊ नये.. – आपले बँक खाते...

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारीचा नवीनच गंभीर प्रकार समोर आला आहे.यामध्ये अनेक बँक खातेधारक अडकल्याचे स्पष्ट झाले...

मोठे कारण आले समोर..! तब्बल ९४ हजार शेतकरी कर्जमाफी योजनेतून बाद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६' अंतर्गत बुधवार २२ जुलै रोजी सर्वप्रथम ५३३ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!