Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम कमिशनिंग व मतदान केंद्रांची पाहणी..

गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम कमिशनिंग व मतदान केंद्रांची पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नगरपरिषद निवडणूक मतदानाची प्रक्रिया येत्या,मंगळवार २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज शनिवारी कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या ईव्हीएम कमिशनिंग प्रक्रियेची तपशीलवार पाहणी केली.यावेळी निवडणूक निरीक्षक मीनाज गनी मुल्ला,गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर,पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण उपस्थित होते.
कमिशनिंग दरम्यान मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम तयार केल्या जात असून,प्रत्येक यंत्राची तांत्रिक तपासणी, उमेदवारांची नावे व बॅलेट पेपरची अचूकता तसेच यंत्राची क्लोजिंग प्रक्रिया व्यवस्थित झाली की नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली.त्यानुसार, आवश्यक त्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.वॉलपेपर डिस्प्ले,मतदान केंद्रांची स्वच्छता, कर्मचारी नियोजन आणि सुविधा यांचे संपूर्ण मूल्यांकन करून मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.याच ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने त्या अनुषंगाने सुरक्षेची पाहणी,उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची व्यवस्था,पत्रकार कक्ष आणि नागरिकांसाठीच्या सोयी व स्वच्छता याबाबतही त्यांनी पाहणी केली.
ईव्हीएम प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी पंडा यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट दिली. यामध्ये महिला महाविद्याल मतदान केंद्र,झाशी राणी नगर येथील नगरपरिषद ग्रंथालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा या मतदान केंद्रांचा समावेश होता. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये,प्रत्येक केंद्र सुस्थितीत व सुबकपणे कार्यरत राहावे, असे सांगून या सर्व ठिकाणी असलेल्या मूलभूत सुविधांची उपलब्धता,स्वच्छता,स्वतंत्र स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था,पिण्याचे पाणी,रॅम्प,दिव्यांगांसाठी प्रवेश सुविधा यांची सविस्तर माहिती घेतली व आवश्यक सुधारणा विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.ज्या ठिकाणी किरकोळ त्रुटी आढळल्या,त्याबाबत त्यांनी तात्काळ उपाययोजनांची सूचना करत मतदान केंद्रे पूर्णपणे सज्ज ठेवण्याविषयी भर दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान साहित्याच्या वाहतूक नियोजनाचा देखील आढावा घेतला.मतदान साहित्य कोणत्या वेळेत,कोणत्या क्रमाने व कोणत्या वाहनाद्वारे केंद्रावर पोहोचवायचे याबाबतची सविस्तर माहिती घेऊन त्या अनुषंगाने निर्देश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!