उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- दोन दिवस अवकाळी पाऊस पुन्हा थैमान घालणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.त्यानुसार आज दिनांक- २२ एप्रिल २०२४ रोजी ढगाळ वातावरण निर्माण होऊन गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर,भंडारा,गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊस थैमान घालणार आहे.त्यानुसार नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.दोन दिवस म्हणजेच आज २२ एप्रिल व उद्या २३ एप्रिल रोजी अनेक ठिकाणी मेघ गर्जना तसेच वादळ वारा व पाऊस थैमान घालणार आहे.गेल्या काही दिवसांपासून दिवसा ऊन आणि सायंकाळच्या सुमारास पासाचा खेळ सुरूच आहे.त्यामुळे नगिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पावसा नंतर उष्णतेची लाट उसळणार असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे उद्रेक न्युज वृत्ताचे मुख्य संपादक यांनी कळविले आहे.

