Thursday, August 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तखासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)’सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा पेटला आहे.या निर्णयाच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसांपासून खासगी दवाखाने ओस पडली आहेत. अश्यातच आज,गुरुवार ६ ऑगस्ट पासून खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण(आयपीडी) विभागही बंद ठेवण्याचा निर्णय खासगी डॉक्टरांनी घेतला आहे.त्यातच,नागपूरच्या मेयो आणि मेडिकलमधील निवासी डॉक्टरही पूर्ण ताकदीने संपात उतरल्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भातील आपत्कालीन आणि वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.शासकीय रुग्णालयांचा कणा मानल्या जाणाऱ्या निवासी डॉक्टरांनी सुरुवातीला बाह्यरुग्ण विभागावर(ओपीडी)बहिष्कार टाकला.परत आज गुरुवारी ओपीडी,आयपीडी व वॉर्डातील सेवाही ठप्प होण्याचा इशारा देण्यात आला आहे.यामुळे संपूर्ण विदर्भातून  रुग्णांची सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत सीसीएमपी पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसीमध्ये नोंदणी देण्याची प्रक्रिया तत्काळ स्थगित करावी,अशी मुख्य मागणी मार्ड संघटने केली आहे. याशिवाय,निवासी डॉक्टरांची पदभरती,विद्यावेतनवाढ, सुरक्षितता,निवास व्यवस्था आणि शैक्षणिक सुविधा या प्रलंबित मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. शासनाच्या भूमिकेवरच पुढील आंदोलनाची दिशा ठरेल, असा थेट इशाराही संघटनेने दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!