- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्याच्या भावात दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे.शेतीत लागणारा मुख्य घटक म्हणजे खत.त्यांच्या किमतीत मागील दहा वर्षांत ५५० रुपयांनी वाढ झाली आहे; परंतु त्या तुलनेत धानाच्या भावात पाहिजे तशी वाढ झाली नाही.परिणामी यंदा परतीच्या पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलले.शेतीमध्ये खरीप आणि रब्बी हंगामात पिके घ्यायची म्हटले तर रासायनिक खताशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही.मागील दहा वर्षांच्या काळात खताची ‘डीएपी’ची बॅग ८५० वरून १,४०० रुपयांवर येऊन ठेपली आहे.
शेतकऱ्यांच्या धान तसेच इतर शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे आता समोरील काळात शेती करायची कशी? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
- Advertisement -