Friday, August 21, 2026
Homeदेसाईगंजखतांच्या वाढिव किंमती कमी करुन युरिया खताचा काळाबाजार रोखण्याची मागणी.. - देसाईगंज...

खतांच्या वाढिव किंमती कमी करुन युरिया खताचा काळाबाजार रोखण्याची मागणी.. – देसाईगंज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-खताच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आला असुन सद्या कृषी केन्द्रांमार्फत युरिया खताचा काळाबाजार सुरु आहे.या भ्रष्टाचारावर लगाम घालुन खताच्या किंमती पुर्ववत करा,अश्या मागणीचे निवेदन आज, शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देसाईगंज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
खताची एक बॅग १ हजार ३५० वरुन सरसकट २ हजार २०० रुपये करण्यात आली.महागाई व वाढत्या मजुरीच्या दरांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.असे असतांना युरिया खताचे शासकिय मुल्य २६७ रुपये असतांना कृषी केन्द्र चालक प्रती बॅग ३३० ते ३५० रुपयाला विक्री करुन शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करतात.ही बाब योग्य नसुन यावर आळा घालण्यासाठी शासनाने रासायनिक खताचे दर पुर्ववत करुन युरिया खताचा काळाबाजार थांबवावा, या आशयाचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देसाईगंजच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर यांचे मार्फतीने सादर केले.
  • वंचितच्या आवाजाला बहुजन समाज पक्षाची साथ👇
शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने चांगले पाऊल उचलत भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आवाज उठवला.या लोकोपयोगी निवेदनाचे बहुजन समाज पक्षाच्या वतीने समर्थन करण्यात आले.या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम,तालुकाध्यक्ष विनोद मेश्राम,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भीमराव शेन्डे,शहर अध्यक्ष प्रा.अशोक मेश्राम,शिवदास बन्सोड,खुशाल मेश्राम,दिलिप बन्सोड, हेमराज मेश्राम,नितेश रामटेके,शिशुपाल वालदे,धनराज मेश्राम,भाग्यवान बन्सोड,भारत मस्के, स्वप्निल मेश्राम यांचेसह बीएसपीचे जिल्हा उपाध्यक्ष जागेश्वर माने, महासचिव विनायक धारगावे,शहर अध्यक्ष आशिष घुटके,कृणाल लांडगे आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी.. -३० हजार घेतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ३३ वर्षीय इसमास पोलीस हवालदाराने दम देत परिसरात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर ३५...

पूरबाधित ५०० कुटुंबांना आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात  जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे आज शुक्रवारी वाटप...

रक्तदानातून आमदार रामदास मसराम यांना ५७ व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा.. – आज ५७ रक्तदात्यांचे रक्तदान; मिसार दाम्पत्य ठरले प्रेरणादायी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या उद्या,शनिवार २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा क्षेत्र व आमदार...

सोने-चांदीचे दर गगनाला भिडले; आज मोठी उसळी..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही कालावधीपासून सोने-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होतांना दिसून येत आहे. अश्यातच आज,शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी सकाळीच सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी झाल्याने ग्राहकांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!