Tuesday, July 28, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे भाजपा तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न.. - जनकल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा...

कोंढाळा येथे भाजपा तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न.. – जनकल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण तालुका कार्यकारणी बैठक काल रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली.या बैठकीत आगामी काळातील पक्ष संघटन मजबूत करणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णा गजबे,तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून भाजपचे जिल्हा सचिव राजू जेठाणी,सुनील पारधी भाजपा तालुका अध्यक्ष,भरत जोशी,गोपाल उके माजी सभापती, मोहन गायकवाड माजी उपसभापती देसाईगंज,महादेव पारधी माजी सरपंच मोहटोला,मारोती दोनाडकर,योगेश नाकतोडे,वसंता दोनाडकर, खरकाटे माजी पोलिस पाटील,मारोती दोनाडकर, केवळराम झोडे बोळधा,शंकर पारधी भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष,अनिल मुलकलवार तालुका उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.
बैठकीला संबोधित करतांना माजी आमदार कृष्णा गजबे म्हणाले की, ” मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्याने प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत.पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ‘बुथ तिथे शक्ती’ हा मंत्र घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.प्रत्येक बुथ सक्षम करणे हेच आपले प्रमुख ध्येय आहे.”
यावेळी देसाईगंज कार्यकारणी बैठकीत माजी सभापती गोपाल उके यांची निवड आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या संचालकपद झाल्याबद्दल भाजपा तालुका कार्यकारणीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.तर राजकीय ठराव आणि आगामी कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली.बैठकीत महिला आघाडी,युवा मोर्चा आणि विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा आढावा सादर केला.त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक देसाईगंज भाजपा तालुका अध्यक्ष सुनील पारधी यांनी केले तर  सूत्रसंचालन रोशन ठाकरे व उपस्थित सर्व पदाधिकारी,मान्यवरांचे आभार योगेश नाकतोडे  यांनी मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!