Wednesday, July 29, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे 'पुजित मंगल अक्षता कलश' ची स्थापना…संपूर्ण परिसर गुंजला 'जय श्रीराम'...

कोंढाळा येथे ‘पुजित मंगल अक्षता कलश’ ची स्थापना…संपूर्ण परिसर गुंजला ‘जय श्रीराम’ च्या गजराने

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा(देसाईगंज) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावामध्ये काल,बुधवार दिनांक- २७ डिसेंबर ला सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास अयोध्या वरून प्रभू श्रीराम यांच्या पुजित मंगल अक्षता कलशचे आगमन झाले.त्यानुसार गावामध्ये पुजित मंगल कलश शोभा यात्रेचे आयोजन श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या पुजित अक्षता कलश समिती कोंढाळाच्या वतीने करण्यात आले होते.

हिंदू-सनातन समाजाच्या गौरवान्वित ऐतिहासिक दिनाला देश भरात गांवो-गांवी तसेच घरो-घरी दिवाळी सारखा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असून प्रभू श्रीराम यांच्या पुजित मंगल अक्षता दिनांक -२२ जानेवारी २०२४ रोजी घरोघरी वाटप करण्यात येणार आहेत.पुजित मंगल कलश शोभा यात्रा सर्वप्रथम बस स्थानक परिसरापासून ते गावातील हनुमान मंदिर- इंदिरा नगर,नवनगर टोली समाज हनुमान मंदिर-दुर्गा मंदिर,जुना देऊळ हनुमान मंदिर,नवीन देऊळ हनुमान मंदिर,आझाद चौक,माराई माता मंदिर या ठिकाणी काढून शेवटी ‘पुजित मंगल अक्षता कलश’ ची स्थापना दत्त मंदिर कोंढाळा येथे करण्यात आली. पुजित मंगल कलश शोभा यात्रेमध्ये गावातील आबालवृद्ध,पुरुष-महिला मंडळी,युवक-युवती तसेच भाविक-भक्त गण मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रभू श्रीराम नामाचा जयघोष करीत संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम’ च्या गजराने गुंजित होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!