उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील माळी समाज कोंढाळा व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने काल १० मार्च रोजी विद्येची ज्योती,आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून कोंढाळा माळी समाज भवनातील सावित्रीमाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
अभिवादना नंतर उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचे जयघोष करीत सावित्रीबाईंच्या जीवन मनावर प्रकाश टाकला.अभिवादन प्रसंगी माळी समाज कोंढाळा चे अध्यक्ष नामदेव वसाके,देसाईगंज राकाँ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे तालुकाध्यक्ष पवन खोब्रागडे,प्रतिष्ठित नागरिक वासुदेव बुराडे,सुमित बोरुले,जितेंद्र मोहूर्ले,अनिता बोरूले,पार्वता बोरुले,गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.