Sunday, October 25, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून अवैध रेतीचा उपसा-करोडो रुपयांना रेती तस्करांनी लावला...

कोंढाळा पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून अवैध रेतीचा उपसा-करोडो रुपयांना रेती तस्करांनी लावला चुना.. देसाईगंज महसूल प्रशासन गाढ झोपेत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून अवैध रेतीचा उपसा गेल्या बऱ्याच महिन्यांपासून सुरू असून अंदाजे २० हजार ब्रास च्या वर अवैध रेतीचा उपसा चोरट्यांकडून केला गेला असून गावात तसेच देसाईगंज शहर त्याचबरोबर तालुक्यातील इतर गावांमध्ये अवैध रेतीचा चोरट्यांकडून पुरवठा करून बांधकामे तसेच चोरीच्या रेतीचा वापर करून कामे पूर्ण करण्यात आली असल्याने यावर आळा घालण्यास प्रशासन चींधीचोर झाल्याचे आढळून येत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून अवैध रेतीचा उपसा दररोज रात्री तसेच पहाटेच्या सुमारास ट्रॅक्टर तसेच इतर साधनांद्वारे केला जातो आहे.यामध्ये कोंढाळा गावातील रेती तस्कर, उसेगाव व देसाईगंज येथील रेती तस्कर ऑर्डर घेऊन बोलबाला करीत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.काहीजण कमी ऑर्डर मिळण्याच्या नादात रेतीचा भाव कमी करून गावात तसेच इतर ठिकाणी अवैध रेती विक्री करण्याच्या नादात जणूकाही ठेकाच घेतलेला असल्याचे दिसून येत आहे.अशातच गुपित माहितीच्या आधारे सर्वांचे खिसे गरम होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असल्याने ‘जे सुरू आहे ते सुरू राहू द्या..! एखादा साधन पकडण्यास चुपच्याप पैसे घेऊन सोडून द्या..! अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे कुणीही लक्ष घालीत नसल्याचे दिसून येत आहे.यावर कुठेतरी आळा घातला जावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

(पुढील बातमी :- रेती चोरट्यांच्या नावानिशी)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!