Saturday, September 12, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा ग्रामपंचायत तर्फे वृक्षदिंडी,वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.. - नोडल अधिकारी म्हणून गडचिरोली जिल्हा...

कोंढाळा ग्रामपंचायत तर्फे वृक्षदिंडी,वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.. – नोडल अधिकारी म्हणून गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच २२ जुलै रोजी “हरित महाराष्ट्र,समृद्ध महाराष्ट्र” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.“हरित महाराष्ट्र” मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ४० लाख वृक्ष लागवड करण्यात येणार असून,सदरचे अभियान जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारे ठरणार आहे.अश्यातच वृक्ष लागवडीसह वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याने मानवी जीवनात वृक्षांचे महत्त्व लक्षात घेता देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायत तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वृक्षदिंडीच्या माध्यमातून जनजागृतीसह वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे,यंदाच्या वृक्षारोपण कार्यक्रमास विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.यात गडचिरोली जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कणसे,देसाईगंज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे सह इतर मान्यवरांनी हजेरी लावली होती.
सर्वप्रथम वृक्षदिंडी काढून ‘झाडे लावा झाडे जगवा’ व विविध नारे लावून शालेय विद्यार्थी,ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक,उपस्थित मान्यवरांच्या वतीने वृक्ष लागवडी बाबत संदेश देण्यात आले.त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंढाळा,विद्यानिकेतन लोकमान्य टिळक विद्यालय तसेच स्मशान भूमी परिसरासह इतर ठिकाणी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.वृक्षदिंडी या कार्यक्रमाला नोडल अधिकारी म्हणून गडचिरोली जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कणसे यांच्या जिल्ह्यातील उत्कृष्ट योगदानाबदल ग्रामपंचायत कोंढाळातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना रवींद्र कणसे म्हणाले की,गडचिरोली जिल्हा हा वृक्षसंवर्धनात महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकावर असून विविधतेने नटलेला आहे.जिल्ह्यात विविध प्रजातींचे वृक्ष असून अनेक वृक्षांचा औषधांसाठी वापर केला जातो आहे.इतर धनसंपत्ती पेक्षाही आपल्याकडे वृक्षांसारखी मोठी धनसंपत्ती आहे.दरवर्षी वृक्ष लागवड केली जात असल्याने आणखी त्यात भर पडून इतर जिल्ह्यांनी याची प्रेरणा घ्यावी,असेही ते म्हणाले.
वृक्षदिंडी,वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी कोंढाळा
ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघाडे,
भूमेश्वरी गुरनुले,नलीता वालदे,शिल्पा चौधरी, ग्रामसेविका मेघना राऊत,पोलीस पाटील किरण कुंभलवार,कृषी सहाय्यक राहुल तुळसकर,प्रतिष्ठित नागरिक पंढरी नखाते,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,आरोग्य उपकेंद्राच्या डॉ.कुथे,आरोग्य कर्मचारी,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत हेडाऊ, शिक्षक योगेश ढोरे,जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षकवृंद,मुख्याध्यापक लो.टि.विद्यालय,शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी,अंगणवाडी सेविका,मदतनीस, ग्रामपंचायततीचे कर्मचारीवृंद तथा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!