Tuesday, July 14, 2026
Homeगोंदियाकेवळ मतांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली.. - योजनेचा पैसा कुणाच्या बापाचा...

केवळ मतांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली.. – योजनेचा पैसा कुणाच्या बापाचा नाही; सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स भरतात त्यांचा हा पैसा आहे.. – समाचार घेतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या काँग्रेसच्या सभेमध्ये दिसत असतील तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला सांगा,आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्याचा समाचार घेतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी जोरदार प्रहार करीत,लाडकी बहीण योजनेचा पैसा कुणाच्या बापाचा नाही,तो सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स भरतात त्यांचा हा पैसा आहे.त्यामुळे कुणीही याचा आव आणू नये; असे सांगत महाडिक यांच्यावर टीका केली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ सडक अर्जुनी येथे काल,रविवारी १० नोव्हेंबर ला आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.आमदार बच्चू कडू म्हणाले की,आम्ही दुधाला भाव मागितला,आम्ही धान पिकाला भाव मागितला होता.पण,ते सरकारला जमलं नाही.केवळ मतांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली.त्यामुळे सरकारचा हा डाव लाडक्या बहिणींनासुद्धा कळला असून,त्या नक्कीच तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत; असा इशारासुद्धा यावेळी दिला.अर्जुनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि या क्षेत्राला विकासाची नवी गती देण्यासाठी युवा नेतृत्व डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे,उमेदवार डॉ.सुगत चंद्रिकापुरे,प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर व पदाधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!