Monday, July 13, 2026
Homeकुरुडकुरूड येथे श्री गजानन महाराज प्रगट दिना निमित्त गोपालकाल्याचे आयोजन - सर्व...

कुरूड येथे श्री गजानन महाराज प्रगट दिना निमित्त गोपालकाल्याचे आयोजन – सर्व भाविक-भक्त जनतेंनी गोपालकाल्याचा लाभ घेण्याचे मनोज ढोरे यांनी केले आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरूड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे श्री गजानन महाराज प्रगट दिनाचे आयोजन ७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुारीपर्यंत श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान पाटील मोहल्ला कुरुडच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून हरी भक्त परायण लीनाताई बागळे ,सोनिताई आळंदीकर व कावळे महाराज आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून प्रवचनाचा, कीर्तनाचा,हरिपाठ व गोपाल काल्याचा कार्यक्रम संपन्न होत असल्याने सर्व भाविक-भक्त,जनता – जनार्दन यांनी उद्या १३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान पाटील मोहल्ला कुरुड याठिकाणी गोपाल कल्याचा लाभ घ्यावा; असे आवाहन जिल्हा सचिव ओबीसी काँग्रेस कमिटी गडचिरोली तथा प्रदेश सचिव पोलीस दक्षता पीपल्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य,मनोज महादेवराव ढोरे यांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा श्री गजानन महाराज प्रगट दिनाचे आयोजन कुरुड येथील पाटील मोहल्ला याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी होऊन भजन,कीर्तन,पालखी मिरवणूक व विविध कार्यक्रम सातही दिवस साजरे करून श्रींचा गाजावाजा करून श्री गजानन महाराज प्रगट दिनी श्रींच्या चरणी माथा टेकून तल्लीन होत असतात. अशाच प्रकारे उद्याला श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान पाटील मोहल्ला कुरुड याठिकाणी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोपालकाला,त्यानंतर महाप्रसाद व सायंकाळच्या सुमारास श्री गजानन महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असल्याने याचा लाभ भाविक-भक्त जनता-जनार्दन,कुरुड ग्रामवासिय जनतेंनी घ्यावा असेही ओबीसी काँगेस कमिटीचे जिल्हा सचिव मनोज ढोरे यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!