उद्रेक न्युज वृत्त
कुरूड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे बिरसा मुंडा आदिवासी महिला सोसीअल वेलफेअर एज्युकेशन संस्था अर्जुनी-मोरगाव जिल्हा-गोंदिया यांच्या वतीने १९ फेब्रुवारी ला (उद्या) शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने बळीराजा चौक याठिकाणी सकाळी ७.३० ते १२.००वाजेच्या सुमारास मोफत नेत्ररोग निदान चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याने; सदर मोफत शिबिराचा गावातील जनतेंनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम यांनी केले आहे.
सभोवतालील परिसरातील,ग्रामीण भागातील महाग वैद्यकीय सेवेच्या अडचणी लक्षात घेता; तपासणीसाठी मोफत सेवेचे आयोजन केले आहे.डोळयांची तपासणी करून चष्म्याचे नंबर दिल्या जातील व गरजूस अल्प शुल्कात चष्मे मिळणार आहेत.सदर मोफत शिबिरात ज्यांना डोळयांचा त्रास असेल,जसे,डोळयातुन पाणी येणे,डोके दुखणे,दुरचे-जवळचे बरोबर न दिसणे इत्यादी.अशांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करुन घ्यावी.तपासणी निशुल्क राहील.गरजूंना अल्प शुल्कात चष्मा दिला जाईल; तपासणी १० वर्षाच्या मुलांपासुन ते म्हातारपणा पर्यंत मोफत डोळे तपासणी करून मिळणार असल्याने सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा; असे गेडाम यांनी म्हंटले आहे.