उद्रेक न्युज वृत्त
कुरूड :- श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान पाटील मोहल्ला कुरुड याठिकाणी आज १३ फेब्रुवारी ला दुपारी १ वाजेच्या सुमारास समाज मंदिर बांधकामाचे आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.
कुरुड येथील गजानन महाराज मंदिर देवस्थान पाटील मोहल्ला येथील भाविक-भक्त,जनता-जनार्दन व गावातील नागरिकांनी आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे नवीन समाज मंदिर बांधकामासाठी काही महिन्यांपूर्वी मागणी केली होती.त्यानुसार गजबे यांनी आमदार निधीतून समाज मंदिराचे बांधकामास निधीचा पुरवठा करून दिला व भाविक-भक्त,जनता-जनार्दन व गावकऱ्यांसाठी नवीन समाज मंदिराची सोय उपलब्ध करून दिली आहे.याच निमत्ताने श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या गोपाल काल्याचे औचित्य साधून आज १३ फेब्रुवारी रोजी नवीन बांधकाम केलेल्या समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.
लोकार्पण सोहळा निमित्त आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,ग्रामपंचायत उपसरपंच क्षितिज उके,पोलीस दक्षता पीपल्स असोसिएशनचे मनोज ढोरे,माजी पंचायत समिती सभापती अर्चनाताई ढोरे,ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय चलाख,ग्रामपंचायत सदस्य शंकर पारधी,आशाताई मिसार,प्रतिष्ठित नागरिक,श्री गजानन महाराज मंदिर देवस्थानचे भाविक-भक्त व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.