Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडा-कोरची,सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन..

कुरखेडा-कोरची,सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अपघातांची शक्यता आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपूर्ण कामामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची दखल घेत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी दोन प्रमुख मार्गांवरील वाहतुकीसंदर्भात महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहने सुरु असून सदरील रस्ता पावसाळ्यात जड वाहतुकीस पूर्णतः अयोग्य असल्याने हा मार्ग ५ जून च्या मध्यरात्रीपासून ते ३१ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सिरोंचा ते आलापल्ली मार्गावरील जड वाहने मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली या पर्यायी मार्गाचा तसेच आलापल्लीहून मंचेरियालकडे जाण्यासाठी आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल या पर्यायी मार्गाचा वापर करतील.मात्र, आपत्कालीन,आरोग्य,पाणीपुरवठा,पोलीस,अन्न-औषध,महावितरण,दूरसंचार,रस्ते दुरुस्ती व प्रवासी सेवा वाहनांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.
दरम्यान,राष्ट्रीय महामार्ग क्र.५४३ वरील कुरखेडा ते कोरची मार्गावर सती नदीवरील पूरबुडीत जुन्या पुलाजवळ नव्या मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु असून वळण रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करण्यात येत आहे.मात्र,पावसाळ्यात हा वळण मार्ग पाण्याखाली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येत्या ४ जून २०२५ मध्यरात्री पासून ते ३१ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत कुरखेडा–कोरची मार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. हलक्या वाहनांसाठी कुरखेडा-आंधळी फाटा-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा आणि कुरखेडा-तळेगाव-खेडेगाव-अंतरगाव-पुराडा हे मार्ग वापरण्यात येतील, तर जड वाहनांसाठी कुरखेडा–वडसा–आरमोरी–वैरागड–गोठणगाव फाटा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित तहसिलदार,पोलीस विभाग,परिवहन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना आवश्यक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.मार्गदर्शक फलक इंग्रजी,हिंदी व मराठी भाषेत लावण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असून ट्रॅफिक नियमनासाठी पोलीस विभाग आवश्यक मनुष्यबळ व बॅरेकेडींगची व्यवस्था करणार आहे.संबंधित तहसिलदार व पोलीस निरीक्षकांनी आठवड्याला संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावेत.मोटार वाहन कायदा १९८८,भारतीय दंडसंहिता १८६०,महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत संबंधितांचे पालन करणे बंधनकारक असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने वाहतूकदार, वाहनचालक तसेच नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!