नागपूर :-एकीकडे मुले होत नाही म्हणून अनेक दाम्पत्य महागडे उपचार,उपासतापास,नवस व देवाकडे साकडे घालीत असतात.एकीकडे मुलांसाठी सर्वकाही करीत असतांना दुसरीकडे गोंडस चिमुकल्यांना प्रतिष्ठेच्या भीतीपोटी मरायला सोडणारे निष्ठुर लोकदेखील जगात आहेत.अशीच घटना नागपुरात उघडकीस आली आहे.नागपुरात तीन महिन्यांची गोंडस मुलगी कचऱ्याच्या ढिगाजवळ पडलेली आढळली.तिच्या अंगाला मुंग्या चावा घेत होत्या.मात्र,एका महिलेच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचा जीव वाचला.कुठलाही दोष नसतांना निष्ठुरतेचे चटके झेलणाऱ्या चिमुकलीकडे पाहून पोलिस कर्मचाऱ्यांचे डोळेदेखील पाणवले.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पवनसुतनगर येथे ही घटना घडली.पवनपुत्रनगरमध्ये पाण्याची टाकी आहे.सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कचरा वेचणारी महिला तेथे गेली.ती कचऱ्यातून प्लास्टिकच्या वस्तू उचलत होती.त्याचवेळी महिलेला कचऱ्यातच असलेल्या झुडपातून मुलीच्या रडण्याचा आवाज आला.ती स्तब्ध झाली.तिने पाहणी केली असता चिमुकली जमिनीवर पडलेली दिसली.त्यांनी परिसरातील लोकांना माहिती दिली.त्यांनी पोलिसांना माहिती दिली.हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले.स्कार्फ जमिनीवर पसरवून मुलीला ठेवण्यात आले होते.मुलीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला आणि कानाजवळ जखमा दिसत होत्या. पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून मुलीच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कोणतीही माहिती न मिळाल्याने मुलीला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले.तपासणीनंतर डॉक्टरांनी मुलीची प्रकृती सामान्य असल्याचे सांगितले.
कुठलाही दोष नसतांना निष्ठुरतेचे चटके झेलणाऱ्या चिमुकलीकडे पाहून पोलिस कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणवले.. – तीन महिन्याच्या चिमुकलीला कचऱ्यात दिले फेकून..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक