- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याने ईव्हीएममधील गडबडीमुळे मतमोजणीत घोळ झाल्याचा दावा मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात; अशा मागणीची के.ए.पॉल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र,सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असे कसे होऊ शकते? अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली.
के.ए.पॉल यांनी ईव्हीएम संबंधित एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.याचिकेत,पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात,अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पी.बी.वराळे यांच्या खंठपीठासमोर सुनावणी पार पडली.ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करीत एलॉन मस्क यांच्या ईव्हीएम मशीन बाबतच्या विधानाचा संदर्भही कोर्टात देण्यात आला.तसेच चंद्रबाबू नायडू आणि वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांनी देखील ईव्हीएमबाबत उपस्थित केलेल्या शंकाही कोर्टात सांगितल्या गेल्या.मात्र,सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी जेव्हा पराभूत होतात,तेव्हा ते म्हणतात ईव्हीएममध्ये छेडछाड झालीय.पण जेव्हा ते जिंकतात,तेव्हा ते काहीच म्हणत नाहीत.याकडे आपण कसे बघायचे? असा सवाल कोर्टाने विचारला. तसेच जेव्हा तुम्ही जिंकता,तेव्हा ईव्हीएममध्ये छेडछाड नसते.पण,जेव्हा तुम्ही पराभूत होता,तेव्हा ईव्हीएमसोबत छेडछाड झालेली असते. जगापेक्षा तुम्हाला वेगळे का नकोय?, असेही न्यायमूर्तीनी याचिकाकर्त्यांना विचारले.
- Advertisement -

