Saturday, September 12, 2026
Homeनागपूरकुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची तब्बल १८ वर्षांनी जामिनावर सुटका..!

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची तब्बल १८ वर्षांनी जामिनावर सुटका..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मुंबईचा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची तब्बल १८ वर्षांनंतर आज,बुधवार ३ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास नागपूर मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे.अरुण गवळी यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता.त्यानुसार नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांची मुक्तता केली.
मुंबईतील घाटकोपर येथे २००७ साली शिवसेनाचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी भरदिवसा निघृण हत्या करण्यात आली होती.या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण मुंबई हादरली होती आणि याच प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई सत्र न्यायालयाने २०१२ जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती.गेल्या १८ वर्षांपासून गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.अनेक वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्याला जामीन मंजूर केला.सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यासंदर्भातील अटी आणि शर्ती निश्चित करण्याची जबाबदारी मुंबई सत्र न्यायालयावर सोपवण्यात आली होती.या न्यायालयाने ठरवलेल्या अटी-शर्ती औपचारिकरित्या नोंदवल्यानंतरच गवळीच्या मार्गातला शेवटचा कायदेशीर अडसर दूर झाला.मुंबई सत्र न्यायालयातून आलेल्या जामिनासंदर्भातील आदेशाची प्रत नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला मिळाल्यावर औपचारिक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.त्यानंतर आज बुधवारी अरुण गवळीची जामिनावर सुटका करण्यात आली.प्रकरणाचा अंतिम निर्णय हा फेब्रुवारी २०२६ मध्ये  होणार असून यावर अरुण गवळीचे भवितव्य ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!