उद्रेक न्युज वृत्त
औरंगाबाद :- शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादेत अंबादास दानवे यांच्यावतीने आयोजित केलेल्या हिंदूहृदयसम्राट चषकाचे उद्घाटन प्रसंगीं त्यांनी शिंदे गटावर चांगलीच फटकेबाजी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याठिकाणी आले असते तर आम्ही ही मॅच आधीच खेळली,आम्ही षटकार आधीच मारला असे म्हणाले असते, अशा शब्दात त्यांनी शिंदे यांना टोला लगावला. शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्यातील चित्र अनावरणानंतर बुद्धी येऊ द्या, त्यांना त्यांची चूक कळू देत अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. तसेच काही लोकांच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे राज्य मागे जात आहे,असेही आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी उद्घाटन करताना क्रिकेटच्या पिचवर बॅटिंगही केली.